कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात शॉर्ट सर्किटमुळे आग : चार कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची भीती

Fire at Kolhapur government hospital due to short circuit

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीपीआरच्या ट्रामा सेंटरमध्ये (CPR’s Trauma Center)आग लागली आहे. या नंतर सर्वांना अन्यत्र हलवण्यात आले आहे. ही आग आज (दि.२८) पहाटेच्या सुमारास लागली. ही घटना समजल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई तातडीने सायकलने सीपीआर परिसरात पोहोचले आणि पाहणी केली.

या विभागात कोरोना गंभीर रुग्णांवरउपचार सुरू होते.या घटनेत चार रूग्णांचा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सीपीआरचे अधिष्ठातांसह सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटने लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने दाखल होऊन आग आटोक्यात आणली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER