सम्यक जिनिंग-प्रेसिंगला आग; दोन कोटींचा कापूस जळाला

ginning-pressing-factory-fire

अकोला : अकोला – पातूर मार्गावरील चिखलगाव येथील ‘सम्यक जिनिंग – प्रेसिंग’मध्ये आज पहाटे लागलेल्या आगीत दोन कोटी रुपयांचा कापूस आणि सरकी जळाली. ही जिनिंग-प्रेसिंग वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सम्यक या संस्थेची आहे.

ही बातमी पण वाचा:- भांडणात पिता-पुत्राचा खून

कापूस वाहून नेणाऱ्या पट्ट्यातून ठिणगी उडाल्याने आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. या आगीत चार  हजार क्विंटल कापूस, दोन  हजार क्विंटल सरकी आणि कापसाच्या सुमारे ६० गाठी जळाल्या आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. आग लागली त्यावेळी जिनिंग- प्रेसिंगमध्ये ४५ कामगार होते. सर्व कामगार सुरक्षित आहेत. अकोला महानगरपालिका आणि पातूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER