शरजील उस्मानीला आक्षेपार्ह ट्विट करणे भोवले; जालन्यात एफआयआर दाखल

Sharjeel Usmani

जालना : आक्षेपार्ह ट्विट (offensive tweet) केल्याच्या प्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याच्या विरोधात (Sharjeel Usmani) जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवासी आणि हिंदू जागरण मंचात काम करणारे फिर्यादी अंबादास अंभोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला. उस्मानी याने ट्विटरवर नुकत्याच झालेल्या काही पोस्टमध्ये भगवान राम यांच्याबद्दल अनादर शब्दांचा वापर केला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे अंभोरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी उस्मानीविरोधात बुधवारी रात्री भारतीय दंड संहिता कलम २९५-अ (धार्मिक भावनांना भडकावणारे द्वेषपूर्ण कृत्य) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. हे प्रकरण जालना सायबर विभागात वर्ग करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button