प्रशांत किशोर यांच्यावर कल्पना चोरल्याच्या आरोपावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल

Prashant Kishor

नवी दिल्ली : प्रसिद्ध निवडणूक प्रचार रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील मोतीहारी येथील रहिवासी शाश्वत गौतम यांची कल्पना चोरल्याचा आरोप प्रशांत किशोर यांच्यावर आहे. ‘बात बिहार की’ ही नवी प्रचार मोहीम प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी सुरू केली.

ही कल्पना आपली असल्याचे शाश्वत गौतम यांनी तक्रारीत म्हटले आहे. आपला एक माजी सहकारी ओसामा याने ही कल्पना प्रशांत किशोर यांना सुचवली आणि ती त्यांनी जशीच्या तशी वापरली, असे शाश्वत गौतम यांचे म्हणणे आहे. शाश्वत गौतम यांनी ओसामा यांच्याविरोधातही तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी तक्रार दाखल करणारे इंजिनीअर शाश्वत गौतम यांनी सांगितले की, ‘काही काळापूर्वी मी ‘बिहार की बात’ नावाचा एक प्रोजेक्ट बनवला होता.

दिल्लीतील हिंसाचाराला एमआयएमचे नेते वारिस पठाण कारणीभूत-शिया वक्फ बोर्ड

त्याच्या लाँचिंगची तयारी सुरू होती. मात्र त्या दरम्यान माझ्याकडील एक कर्मचारी ओसामा याने नोकरी सोडली आणि ‘बिहार की बात’ कँपेनचा संपूर्ण कंटेंट प्रशांत किशोर यांना दिला. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी तो आपल्या वेबसाईटवर टाकून ब्रँडिंग सुरू केले. ‘मी माझ्याकडील संपूर्ण कंटेंट जानेवारी महिन्यात आपल्या वेबसाईटवर अपलोड केला होता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी फेब्रुवारी महिन्यात आपली वेबसाईट लाँच केली.’ असे शाश्वत गौतम यांनी सांगितले. दरम्यान, ‘बिहार की बात’ या कार्यक्रमाचे संपूर्ण डिझाईन आपण प्लॅन केले होते, असा दावाही गौतम यांनी केला आहे.