बाबा रामदेवांच्या अडचणीत वाढ; अखेर टीएमसीच्या खासदाराकडून FIR दाखल

कोलकाता :- अ‍ॅलोपॅथी उपचार आणि डॉक्टरांवर टीका करणे योगगुरू बाबा रामदेवांना (Baba Ramdev) चांगलेच भोवले. त्यांच्याविरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (IMA) बंगाल शाखेने कोलकात्याच्या सिंथी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. IMA शाखेचे माजी अध्यक्ष आणि टीएमसीचे खासदार डॉ. शांतनू सेन यांनी बाबा रामदेवांविरोधात FIR दाखल केला आहे.

“आधुनिक औषधांनी कोरोनापीडितांचा मृत्यू होतो. वॅक्सिन घेतल्यानंतरही १० हजार डॉक्टरांचा मृत्यू झाला. आधुनिक उपचार पद्धती आणि अ‍ॅलोपॅथी कोरोनावर उपचार करू शकत नाही.” असे बाबा रामदेव म्हणाले. याआधी IMAने बाबा रामदेवांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. “बाबा रामदेव आधुनिक उपचार पद्धतीची बदनामी करत आहेत. एकीकडे डॉक्टर जीव मुठीत घेऊन रुग्णांना वाचवत आहेत. देशाची सेवा करणाऱ्या या डॉक्टरांचा सन्मान केला पाहिजे. मात्र ते बदनाम करत असल्यानेच गुन्हा दाखल केला आहे.” असे सेन यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button