
मुंबई :देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा नियम मोडल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. IPC कलम १८८ अंतर्गत भिडे गुरुजींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बातमी पण वाचा:- पावसाळ्याचा धोका लक्षात घेऊन लॉकडाऊन शिथिल कारण्याबाबत सरकारमध्ये दुमत
माहितीनुसार , संभाजी भिडे यांनी सांगली ते कोल्हापूर असा प्रवास केला आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीही संमती घेतली नव्हती त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातून विनापरवाना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांव येथे ते आल्याने ही कारवाई आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला