पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद गाणे रचल्यामुळे ‘सा रे गा मा पा’ स्पर्धकावर गुन्हा दाखल

F.I.R File

मुंबई : सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपमास्पद गाणे रचल्याचा आरोप करत बांगलादेशी गायक मेनुल एहसान नोबल ऊर्फ नोबल याच्या विरोधात त्रिपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, गुजरातमधील गांधीनगर शहरातील एका विद्यार्थाने नोबल विरोधात तक्रार केली आहे.

या विद्यार्थाचे नाव सुमन पाल असे असून नोबलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणारे गाणे सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्याने ही तक्रार केली आहे. तक्रारीनंतर गायक मेनुल एहसान नोबेलवर कलम ५००, ५०४, ५०५ आणि कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमनने एक ट्विट केले आहे.

त्यामध्ये त्याने ‘मी मेनुल एहसान नोबल विरोधात तक्रार केली आहे. मी उच्च न्यायालयाला विनंती करतो की, त्याचा भारतीय विजा रद्द करण्यात यावा. त्याच्यासोबत असलेले अनेक कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावे. जेणेकरून तो पुन्हा भारतात येणार नाही’ असे म्हटले आहे. यापूर्वीही मेनुल वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, हे विशेष .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER