‘इंडियन कोरोना’ म्हणणे आले अंगलट; काँग्रेसचे कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर

Kamal Nath

भोपाळ :- ‘इंडियन कोरोना’ (Indian Corona) शब्द वापरून यांनी खोटी माहिती पसरविल्याच्या आरोपात काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांच्याविरुद्ध आयपीसी कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५४ नुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उज्जैन येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत कमलनाथ म्हणाले होते की, जानेवारी २०२० मध्ये कोरोना आला. तेव्हा त्याला ‘चायनीज कोरोना’ म्हटले होते. आज आपण कुठे पोहोचलो आहोत? ‘इंडियन कोरोना’ येईल म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात येने टाळले. विद्यार्थी आणि भारतीय नागरिक ‘इंडियन कोरोना’ घेऊन येतील म्हणून त्यांना रोखून ठेवले आहे. जगभरात देश यामुळे ओळखला जातो आहे. आता आपला देश महान राहिला नाही. आता भारत कोविडचा बनलेला आहे.

भाजपाने केली तक्रार

याबाबत भाजपाने गुन्हे अन्वेषण विभागाला कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button