व्हिसाचे उल्लंघन करून मरकजला गेलेल्या १५६ परदेशींविरुद्ध गुन्हे दाखल

Anil Deshmukh

मुंबई : लॉकडाउनच्या काळात व्हिसाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५६ परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १५६ परदेशी नागरिकांच्या विरोधात परदेशी व्यक्ती कायदा कलम १४ ब आणि भादंवि कलम १८८, २६९, २७० नुसार गुन्हा नोंदविला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, नांदेड, नागपुर, पुणे, अहमदनगर, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हे एकूण १५ गुन्हे नोंदण्यात आले आहेत. आरोपी परदेशी नागरिक पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले आहेत. त्यांनी व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करून निज़ामुद्दीन, दिल्लीच्या मरकज़मध्ये भाग घेतला.

यात कझाकिस्तान – ९, दक्षिण अफ्रिका -१, बांगलादेश – १३, ब्रूने – ४, आयवोरियन्स – ९, इराण-१, टोगो – ६, म्यानमार – १८, मलेशिया – ८, इंडोनेशिया – ३७, बेनिन – १, फिलिपाईन्स – १०, अमेरिका – १, टांझानिया – ११, रशिया – २, जिबोती – ५, घाना – १, किर्गिस्तान – १९ या देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार – अनिल देशमुख