‘परदेस’ चित्रपटाची ही नायिका सोशल मीडियावर का झाली ट्रेंड हे जाणून घ्या

Mahima Chaudary

‘परदेस’ (Pardes) या तिच्या पहिल्या चित्रपटाद्वारे महिमा चौधरीला (Mahima Chaudhary) एका रात्रीत यश मिळाले. तिच्या डेब्यू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी महिमा चौधरीचा १३ सप्टेंबर रोजी ४८ वा वाढदिवस होता. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युझर्सनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा हॅशटॅग समवेत देण्यास सुरुवात केली, मग काय अचानक महिमा चौधरी ट्विटरवरील टॉप ट्रेंडमध्ये सामील झाली.

१९७३ साली दार्जिलिंगमध्ये जन्मलेल्या महिमा चौधरीचे खरे नाव रितु चौधरी आहे. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘परदेस’ या चित्रपटाद्वारे महिमाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये शाहरुख खान, महिमा चौधरी यांच्याशिवाय अमरीश पुरी आणि आलोक नाथ यांच्यासारखे कलाकार होते. परदेससाठी ३००० मुलींचे ऑडिशन घेतल्यानंतर सुभाष घई यांनी महिमाला निवडले. सुभाष घई यांनी नंतर रितु चौधरीच महिमा चौधरी केले.

महिमा चौधरीही तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळे बरीच चर्चेत राहिली. टेनिसपटू लिएंडर पेसबरोबर महिमाचे नाव जोडले गेले होते. ती जवळपास ६ वर्षे पेससोबत संबंधात होती पण हे संबंध पुढे जाऊ शकले नाहीत आणि लवकरच ते दोघे वेगळे झाले. लिअँडरशी ब्रेकअप झाल्यानंतर एका मुलाखतीत महिमाने अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

महिमा म्हणाली की लिएंडर पेस हा एक चांगला टेनिसपटू आहे परंतु माणूस म्हणून तो अजिबात चांगला नाही. त्याने माझी फसवणूक केली आहे. सांगण्यात येते की वर्ष २००५ मध्ये, लिएंडर आणि महिमा दोघे एकमेकांना डेट करत होते. २००६ मध्ये महिमाने आर्किटेक्ट आणि बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत गुप्तपणे लग्न केले. तथापि, वर्ष २०१३ मध्ये महिमा बॉबीपासून वेगळी झाली.

चित्रपटांपासून दूर असूनही महिमा चौधरी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. महिमाने सुमारे ३६ चित्रपटांत काम केले आहे. २०१६ मध्ये ‘डार्क चॉकलेट’ या चित्रपटात ती अखेरच्या वेळी दिसली होती. तिला फिल्मफेअरच्या ‘धडकन’ आणि ‘दिल क्या करे’ साठी सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग श्रेणीत नामांकन मिळालं होत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER