जाणून घ्या कोण कसे पोहचेल आयपीएल 2020 च्या फायनलमध्ये?

आयपीएल 2020 (IPL 2020) मधील प्ले आॕफचे चारही संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या चार स्थानी क्रमाने मुंबई इंडियन्स (MI) , दिल्ली कॕपिटल्स (DC), सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि राॕयल चॕलेंजर्स बंगलोर(RCB). हे संघ आहेत.

आयपीएलच्या 2011 पासून ठरलेल्या स्वरुपानुसार या चार संघात क्वालीफायर (Qualifier) आणि एलिमिनेटर (Elliminator) या स्वरुपात आता पुढचे चार सामने होणार आहेत.

त्यानुसार क्वालिफायर सामना पहिल्या दोन स्थानाच्या संघात म्हणजे मुंबई विरूध्द दिल्ली असा 5 नोव्हेंबरला होणार आहे. यातील विजेता संघ थेट 10 नोव्हेंबर रोजीच्या अंतिम सामन्यातच खेळेल. पण या सामन्यातील पराभूत संघाला तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघात म्हणजे हैदराबाद व बंगलोर या संघात होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाशी 8 नोव्हेंबरला खेळावे लागेल.

सनरायजर्स हैदराबाद विरुध्द राॕयल चॕलेंजर्स बंगलोर हा सामना 6 नोव्हेंबर रोजी होईल. यातील पराभूत संघ थेट स्पर्धेबाहेर होईल मात्र विजेत्या संघाला आणखी एक संधी मिळेल आणि तो मुंबई व दिल्ली यांच्यातील विजेत्या संघाशी 8 रोजी खेळेल. 8 नोव्हेंबरच्या या सामन्यातील विजेता संघ 10 तारखेला दुबईत अंतिम सामन्यात खेळेल.

पारंपरिक उपांत्य सामन्यांमध्ये पहिल्या व दुसऱ्या स्थानावरील संघांपैकी एक एकाच सामन्यात बाद होत होता. मात्र साखळी सामन्यांमध्ये मोठ्या मेहनतीने गूण कमावत पहिल्या दोघांत येणाऱ्या संघाला त्यामुळे पुरेशी संधी मिळत नाही या विचारातून आयपीएलमध्ये 2011 पासून ही क्वालिफायर व एलिमिनेटर पध्दत सुरु करण्यात आली आहे.

यंदाच्या क्वालिफायर व एलिमिनेटर सामन्यांचा कार्यक्रम असा

  • क्वालीफायर सामना

5 नोव्हेंबर – दुबई –
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॕपिटल्स
(विजेता थेट अंतिम फेरीत, पराभूत एलिमिनेटर 2 खेळेल)

  • एलिमिनेटर सामना

6 नोव्हेंबर – अबुधाबी-
सनरायजर्स हैदराबाद वि. राॕयल चॕलेंजर्स बंगलोर
(विजेता क्वालिफायर 2 सामन्यात तर पराभूत संघ बाद)

  • क्वालिफायर दुसरा सामना

8 नोव्हेंबर- अबुधाबी
5 नोव्हेंबरचा पराभूत वि. 6 नोव्हेंबरचा विजेता

  • अंतिम सामना

10 नोव्हेंबर – दुबई
5 नोव्हेंबरचा विजेता वि. 8 नोव्हेंबरचा विजेता

ही बातमी पण वाचा :IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद १० गड्यांनी विजयी होऊन प्लेऑफमध्ये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER