जाणून घ्या नाओमी ओसाकाचा कोण आहे बॉयफ्रेंड?

Naomi Osaka

जगातील सर्वाधिक कमाई करणारी जपानी (Japan) महिला टेनिसपटू नाओमी ओसाका (Naomi Osaka) यंदाच्या यूएस ओपनच्या (US open) उंबरठ्यावर आहे. व्हिक्टोरिया अझारेंकाला मात दिल्यास 2018 नंतर पुन्हा एकदा ती ही स्पर्धा जिंकेल. याशिवाय अमेरिकेत होणाऱ्या कृष्णवर्णियांविरूध्दच्या अत्याचाराविरोधात ती सातत्याने आवाज उठवत आहे. प्रत्येक सामन्यावेळी अमेरिकेतील अत्याचारांचा बळी ठरलेल्या कृष्णवर्णीयांच्या नावाचे मास्क घालून मैदानात उतरण्याची तिची कृती जगभरात लक्षवेधी ठरली आहे. यामुळे ती सातत्याचे चर्चेत असली तर आता आणखी तिच्याबद्दल आणखी एक चर्चा आहे आणि त्या चर्चेचे कारण आहे कॉर्डाइ (Cordae) नावाचा रॕप गायक!

आता क्रँद्रचा आणि ओसाकाचा काय संबंध तर फार जवळचा संबंध आहे. हा क्रँद्र काही साधासुध्दा माणूस नसुन ग्रॕमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला गायक आहे आणि त्याहुनही महत्त्वाचे म्हणजे तो नाओमी ओसाकाचा बॉयफ्रेंड आहे.

सध्या युएस ओपनला कोरोनामुळे प्रेक्षकांना प्रवेश नाही आणि खेळाडूंच्या अगदी जवळच्या मोजक्याच व्यक्तींना प्रवेश आहे. तर काॕर्दे हा अशा मोजक्या व्यक्तींमध्ये गुरुवारी ओसाकाला स्टँडस्मधून प्रोत्साहन देताना दिसला.

काॕर्दे व ओसाकाची मैत्री आताची नाही तर जानेवारी 2019 च्या सुरुवातीपासूनची आहे. नाओमीचा खास पाहुणा म्हणून या 23 वर्षीय गायकाला युएस ओपनच्या बायोबबलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्याच्या उपस्थितीत 22 वर्षीय नाओमीने अमेरिकेच्या जेनिफर ब्रॕडीवर 7-6, 3-6, 6-3 असा विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER