जाणून घ्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापैकी कोणाला कर्णधार म्हणून पाहू इच्छितो VVS Laxman

Rohit Sharma - Virat Kohli - VVS Laxman

IPL २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ५ वा विजेतेपद मिळवल्यानंतर सोशल मीडियावरुन रोहित शर्माला (Rohit Sharma) भारतीय एकदिवसीय आणि टी -२० संघाचा कर्णधार बनविण्याची सतत मागणी होत आहे. यावर आता व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) खुलेपणाने बोलले आहेत.

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटले आहे की मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्याची गरज नाही. विजय लोकपल्ली आणि जी. कृष्णन लिखित ‘द हिटमन: द रोहित शर्मा स्टोरी’ या पुस्तकाच्या आभासी प्रक्षेपणवेळी लक्ष्मणने हे सांगितले.

व्हीव्हीएस लक्ष्मण रोहित शर्माविषयी (Rohit Sharma) म्हणाला की, ‘तो एक महान कर्णधार आहे यात शंका नाही. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तो बर्‍यापैकी यशस्वी झाला आहे. मुंबई इंडियन्सला ५ विजेतेपद मिळवून देणे सोपे नाही.

लक्ष्मण म्हणाला, ‘त्याने (रोहित) ज्या प्रकारे संघ तयार केला आहे आणि कठीण परिस्थितीत संघ हाताळला आहे, तो आश्चर्यकारक आहे. भारतासाठी यशस्वी कर्णधार होण्याचे सर्व गुण त्याच्याकडे आहेत, परंतु येथे बदलण्याची गरज नाही. विराटला जबरदस्त यश मिळालं आहे आणि तो उत्तम प्रदर्शन करत आहे. मला कोणतेही बदल करण्याची गरज दिसत नाही.’

तो म्हणाला, ‘त्याच्या कारकीर्दीमुळे मला माझ्या कारकीर्दीची आठवण येते. सलामीशिवाय दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध खेळणे सोपे नाही. एकदा त्याचा पाय जमला की तो गोलंदाजांवर दबाव आणू शकतो. मला माहित आहे की त्याच्याकडे काहीतरी वेगळं करण्याची क्षमता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही दुहेरी शतक झळकावण्यासाठी धडपड करीत आहोत आणि त्याने वनडेमध्ये ३ दुहेरी शतक झळकावले आहे.’

यावेळी अनिल कुंबळे (Anil Kumble) हे लक्ष्मणसमवेत उपस्थित होते. तो म्हणाला की वेळ येताच रोहित संघाचा ताबा घ्यायला तयार असेल. कुंबळे म्हणाला, ‘जेव्हा आम्ही त्याला मुंबई इंडियन्समध्ये कर्णधारपदाची ऑफर दिली, तेव्हा तो खूप आत्मविश्वासू होता. हे नैसर्गिकरित्या त्याच्याकडे आले. तो आव्हानासाठी सज्ज आहे. पण आम्ही चर्चा करीत आहोत की आमच्याकडे एकमेकांचा पर्याय आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, रोहित आमच्याकडे IPL मध्ये यशस्वी झाला आहे. जेव्हा वेळ येईल आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मला खात्री आहे की तो तयार असेल.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER