जाणून घ्या एलिमिनेटर असून विजेता ठरलेला एकमेव संघ कोणता?

MI-IPL 2020
  • मुंबईने दोन वेळा काढला क्वालिफायरच्या पराभवाचा वचपा
  • क्वालिफायर गमावून आणि क्वालिफायर जिंकून दोन विजेतेपदं पटकावणारा मुंबई एकमेव

गेल्या नऊ वर्षांपासून आयपीएलचा (IPL) शेवटचा टप्पा एलिमिनेटर(Eliminator) व क्वालिफायर (Qualifier) या सुत्राने खेळला जातोय. या नऊ वर्षात केवळ 2012 व 2016 चा अपवाद वगळला तर पहिल्या क्वालिफायर सामन्याच्या संघांतच म्हणजे साखळीत पहिल्या दोन स्थानी राहिलेल्या संघातच अंतिम सामना झाला आहे.

त्यात 2011, 13, 14, 15, 17, 18 व 19 मध्ये क्वालिफायर पहिला सामना ज्या संघात झाला योगायोगाने त्याच संघात अंतिम सामना झाला आणि यापैकी 2013 व 17 चा अपवाद वगळता क्वालिफायर पहिला सामना जिंकणाऱ्या संघानेच विजेतेपद पटकावले. 2013 व 17 मध्ये मात्र मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) क्वालिफायर सामन्यातील पराभवाचा वचपा काढत अंतिम सामना जिंकला होता. आता मुंबईला पुन्हा क्वालिफायर सामना खेळायचा आहे आणि हा इतिहास पाहता पहिला क्वालिफायर सामना जरी ते हरले तरी ते मुसंडी मारतात याकडे इतर संघांना लक्ष द्यावे लागणार आहे.

2012 व 2016 मध्ये मात्र एलिमिनेटर विजेत्या संघाने (चेन्नई व हैदराबाद) अंतिम फेरी गाठली होती आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने 2016 मध्ये विजेतेपद पटकावुन इतिहास घडवला होता. त्यावर्षी ते साखळीअखेर तिसऱ्या स्थानी होते आणि एलिमिनेटर असून विजेतेपद पटकावणारा सनरायजर्स हैदराबाद हा एकमेव संघ आहे.

आता यंदा पुन्हा सनरायजर्सचा संघ साखळीअंती तिसऱ्या स्थानी असुन त्यांना एलिमिनेटर सामना खेळायचा आहे. त्यामुळे ते 2016 ची पुनरावृत्ती करणार का, याची उत्सुकता आहे.

2012 मध्ये सीएसकेचा संघ एलिमिनेटर सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचला होता पण कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानायला लावले होते.

बई इंडियन्स हा क्वालिफायर पहिला सामना हरल्यावर आणि क्वालिफायर सामना जिंकल्यावर अशा दोन्ही प्रकारे विजेतेपद पटकावणारा एकमेव संघ आहे. 2013 व 2017 मध्ये मुंबईचा संघ क्वालिफायरमध्ये अनुक्रमे सीएसके व रायझिंग पूणेकडून हरला होता पण क्वालिफायर दोन जिंकल्यानंतर त्यांनी अंतिम सामन्यात याच सीएसके व रायझिंग पुणे संघांना पराभूत केले होते. 2015 व 2019 मध्ये पहिला क्वालिफायर सामना जिंकून ते विजेते ठरले होते. आता पुन्हा त्यांना क्वालिफायर सामना खेळायचा आहे. तर मुंबईचा संघ 2015 व 19 ची पुनरावृत्ती करेल का, याची आता उत्सुकता आहे.

आयपीएल प्लेआॕफचा इतिहास

वर्ष —– विजेते —— उपविजेते
2011 – चेन्नई ——- बंगलोर
2012 – कोलकाता – चेन्नई
2013 – मुंबई ——– चेन्नई
2014 – कोलकाता – पंजाब
2015 – मुंबई ——— चेन्नई
2016 – हैदराबाद —- बंगलोर
2017 – मुंबई ——— रायझिंग पुणे
2018 – चेन्नई ——— हैदराबाद
2019 – मुंबई ——— चेन्नई

वर्ष —– एलिमि. बाद — क्वालि. 2 बाद
2011 – कोलकाता —— मुंबई
2012 – मुंबई ————- दिल्ली
2013 – हैदराबाद ——– राजस्थान
2014 – मुंबई ————- चेन्नई
2015 – राजस्थान ——- बंगलोर
2016 – कोलकाता —— गुजरात लायन्स
2017 – हैदराबाद ——– कोलकाता
2018 – राजस्थान ——– कोलकाता
2019 – हैदराबाद ——— दिल्ली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER