टीम इंडियाचे ६ खेळाडू ‘फेल’, जाणून घ्या BCCI ची काय आहे ही नवीन फिटनेस टेस्ट

BCCI

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी घेतलेली टेस्ट चर्चेत आहे. संघात निवड होण्यासाठी क्रिकेटपटूंना यो-यो चाचणी उत्तीर्ण करावी लागते, परंतु जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाने आता नवीन टेस्ट (fitness test) देखील सुरू केली आहे. बोर्डाने २ किमीची तंदुरुस्ती चाचणी सुरू केली आहे, ज्याला ६ खेळाडू उत्तीर्ण नाही करू शकले.

या यादीमध्ये संजू सॅमसन, ईशान किशन, नितीश राणा यांची नावे आहेत. याशिवाय राहुल तेवतिया, सिद्धार्थ कौल आणि जयदेव उनाडकट हे देखील आहेत. संघात निवड होण्यापूर्वी खेळाडूंना या चाचणीतून जावे लागते. २ किमी चाचणीत नापास झालेल्या या खेळाडूंना दुसरी संधी मिळेल. जर हे खेळाडू या चाचणीत देखील उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांची निवड केली जाणार नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत BCCI च्या वतीने ही चाचणी घेण्यात आली.

BCCI ने यो-यो टेस्ट सुरू केली तेव्हा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फलंदाज अंबाती रायुडूसारखे बरेच खेळाडू ते पार करण्यात अपयशी ठरले. त्यांना तंदुरुस्तीवर काम करण्यास सांगण्यात आले आणि नंतरच्या प्रयत्नात त्यांनी चाचणी उत्तीर्ण केली.

२ किमी फिटनेस टेस्टमध्ये नापास झालेल्या खेळाडूंमध्ये संजू सॅमसन हा मोठा नाव आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी -२० मालिकेसाठी तो भारतीय संघात होता आणि इंग्लंडविरुद्धदेखील संघात भाग घेण्याची अपेक्षा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर ५ टी -२० आणि ३ एकदिवसीय मालिकेचे आयोजन केले जाईल. मालिकेपूर्वी फिटनेस चाचण्या घेण्यात आल्या.

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत सहभागी होणार्‍या बहुतेक वरिष्ठ खेळाडूंना त्यांचे व्यस्त वेळापत्रक पाहता २ किमीच्या फिटनेस टेस्टमधून सूट देण्यात आली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. या मालिकेची दुसरी कसोटी चेन्नई येथे १३ फेब्रुवारी (शनिवार) पासून खेळली जाणार आहे.

यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरले आहेत हे दिग्गज: चांगले क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जाणारे माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि युवराज सिंग देखील यो-यो टेस्ट पास करण्यात अपयशी ठरले. २०१७ मध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका दौऱ्यासाठी त्यांनी यो-यो टेस्टमध्ये भाग घेतला होता, परंतु ते तेथे उत्तीर्ण होऊ शकले नाही. रैना व्यतिरिक्त युवराज सिंग अनेक वेळा यो-यो टेस्टला अपयशी ठरला आहे. भारतीय संघात निवड होण्यासाठी यो-यो चाचणी उत्तीर्ण होणे फार महत्वाचे आहे. त्याशिवाय निवडकर्ता संघातील कोणत्याही मालिकेत खेळाडू निवडू शकत नाहीत. ही चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी किमान १६.१ गुणांची आवश्यकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER