जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol - Diesel

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर 63 डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास स्थिर होऊनही सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून शनिवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ करण्यात आली. इंधन दरात झालेली ही 12 व्या दिवशीची वाढ आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 39 पैशाची वाढ होऊन हे दर 90.58 रुपये प्रतिलीटरवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 37 पैशांनी वाढून 80.97 रुपयांवर गेले आहेत.

दिल्लीमध्ये शुक्रवारी पेट्रोलचे दर 31 पैशांनी वाढविण्यात आले होते, त्यानंतर राजधानीतील पेट्रोलचे दर 90 रुपयांवर गेले होते. ताज्या दरवाढीनंतर दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये पेट्रोलचे दर 88.92 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 81.41 रुपयांवर गेले आहेत. गुरुग्राममध्ये पेट्रोलचे दर 88.54 रुपयांवर तर डिझेलचे दर 81.55 रुपयांवर गेले आहेत. गेल्या 12 दिवसात दिल्लीत पेट्रोलचे दर 3.64 रुपयांनी वाढले आहेत तर डिझेलचे दर 4.18 रुपयांनी वाढले आहेत.

पेट्रोल दरवाढीची झळ मुंबईलाही बसत आहे. आर्थिक राजधानीत पेट्रोलचे दर 38 पैशांनी वाढून 97 रुपयांवर गेले आहेत तर डिझेलचे दर 39 पैशांनी वाढून 87.06 रुपयांवर गेले आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पेट्रोल 98.60 रुपयांवर गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER