‘बीहड़ का बाघी’मध्ये डाकू शिवकुमार बनलेल्या दिलीप आर्यची कहाणी जाणून घ्या

Find out the story of Dilip Arya, who became a dacoit Shivkumar in 'Behar Ka Baghi'

अभिनेता दिलीप आर्यच्या ‘बीहड़ का बाघी’ (Find out the story of Dilip Arya, who became a dacoit Shivkumar in ‘Behar Ka Baghi’) या वेब सीरिजला चांगलीच पसंती मिळाली. मालिकेत, डाकू  शिवकुमार ऊर्फ दादुआच्या भूमिकेत त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. आज दिलीप आर्यची ओळख लपलेली नाही. उत्तरप्रदेशमधील अमोली या छोट्याशा गावात राहणाऱ्या दिलीपचा प्रवास खडतर होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने केवळ ११ वर्षांत छोटे छोटे काम करायला सुरुवात केली.

एका मुलाखती दरम्यान दिलीपने आपल्या बालपणीचे दिवस आठवत सांगितले, “माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी ११ वर्षांचा होतो; पण मी हार मानली नाही.” आई शेतात काम करत असतानासुद्धा मी काम करण्यास सुरुवात केले. त्यानंतर मी चांगले पैसे मिळवण्यासाठी टेलरच्या दुकानात काम केले आणि सोबत अभ्यासही सुरू ठेवला.”

कानपूर विद्यापीठातून आणि त्यानंतर भारतेंदु नाट्य अकादमीमधून पदवी घेतल्यानंतर दिलीप सिनेमाच्या प्रेमात पडला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये  (National School of Drama)प्रवेश घेण्यासाठी तो दिल्लीला पोहचला.

तो म्हणाला, “मी तेथील स्थानिक गटाबरोबर (Local Group) थिएटर करण्यास सुरुवात केली  आणि एन. के. शर्मा यांच्यासमवेत थोडा काळ काम केले. त्यानंतर मी एनएसडीसाठी (NSD) अर्ज केला. तिथे मी पंकज त्रिपाठी, इनामुल हक या कार्यशाळेतील सुप्रसिद्ध स्टार यांच्याबरोबर काम केले. पण मला उडण्यासाठी पंख देणारी जागा बीएनबी होती. मला तिथल्या अनुभवी शिक्षकांकडून अभिनयाचे  बारकावे शिकायला मिळाले.  त्या जोरावर मी आज इथे पोहचलो आहे.

चित्रपटांमध्ये काम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिलीप मुंबईत आला. त्याला एका वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यात त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. दिलीपजवळ सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. तो म्हणाला, “माझ्या कार्याला लोकांकडून खूप प्रेम मिळाले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तुमच्या परिश्रमांचे कौतुक करणे चांगले आहे आणि मला आशा आहे की, चित्रपट निर्मात्यांनी माझ्या कार्याकडे लक्ष दिले आहे आणि आता ते मला अभिनेता म्हणून संधी देतील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Dilip Arya (@dilip.arya001)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER