शिखर धवन त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या आयशा मुखर्जीच्या प्रेमात कसा पडला?

Ayesha Mukherjee - Shikhar Dhawan

टीम इंडियाच्या ‘गब्बर’ शिखर धवनने क्रिकेट मैदानावर केवळ धावा केल्या नाहीत तर इश्काच्या खेळपट्टीवरही चौकार आणि षटकार ठोकले आहेत; तो ठिकाणी खूप यशस्वी झाला आहे.

स्वत:ला प्रेमबंधनापासून दूर ठेवणे खूप कठीण आहे. मग ते बॉलिवूडचे अभिनेते असो किंवा क्रीडाविश्वातील खेळाडू असो. परंतु फिल्म स्टार्सची लव्हस्टोरी बरीच प्रसिद्ध असते; पण क्रीडापटूंच्या लव्हस्टोरीबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. आज तुम्हाला भारतीय क्रिकेट टीमच्या अशा बल्लेबाजाची प्रेमकथा सांगणार आहोत, ज्याला संपूर्ण विश्व क्रिकेटचा ‘गब्बर’ म्हणतो. होय, आता आपण समजलेच असाल की, शिखर धवनबद्दल बोलत आहोत.

क्रिकेटविश्वात ‘गब्बर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या धवनला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही; कारण तो खेळाबरोबरच त्याच्या प्रेमकथेमुळेही बराच चर्चेत राहिला आहे. तो स्वत:पेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या आयशा मुखर्जीच्या प्रेमात पडला. आता सर्वांच्या मनात हा प्रश्न आहे की, ऑस्ट्रेलियात राहणारी आयशा मुखर्जी आणि दिल्ली येथे राहणारा शिखर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे अडकले गेले? वास्तविक शिखर आणि आयशाची सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली. फेसबुकवर आयशाची छायाचित्रे पाहून शिखर वेडा झाला. पण तुम्हाला माहिती आहे काय की, भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगचादेखील या दोघांना एकत्र आणण्यात मोठा हात आहे?

 

View this post on Instagram

 

प्यार ❤

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

हरभजनसिंग आधीपासून प्रोफेशनल असलेल्या ऑस्ट्रेलियन बॉक्सर आयेशाला ओळखत होता. हरभजननेच दोघांची पहिली भेट करून दिली होती. पहिल्या भेटीनंतर शिखरने आयशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आणि हळू हळू दोघेही बोलू लागले. मग त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होण्यास वेळ लागला नाही. प्रेम झाले; परंतु अद्याप ते लग्नापर्यंत पोहचलेले नव्हते; कारण आयशा ही शिखरपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. शिखर वगळता सर्वांना या गोष्टीचा खूप त्रास झाला. यासाठी त्याच्या मित्रांनी बर्‍याच वेळा त्याला अडवले; पण जेव्हा प्रेम होते तेव्हा कोण ऐकतो?

परंतु ही एकमेव समस्या नव्हती, वयाच्या फरकाशिवाय आयशाचा घटस्फोटही झाला आहे. तिला दोन मुलीही आहेत. तिचे लग्न ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी झाले होते; पण हे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत आणि त्यांचा घटस्फोट झाला. आता आयशाला भीती वाटली होती की, शिखर आपल्या दोन्ही मुलींना स्वीकार करेल काय? शिखर वडिलांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम असेल का?

पण त्याच गब्बरने हेदेखील दाखवून दिले की, तो केवळ नावाचा खलनायक नाही आहे, खरे तर तो एखाद्या नायकापेक्षा कमी नाही आणि त्याने हे सिद्ध केले की, तो आयशावर खरेच खूप प्रेम करतो. शिखरने आयशाला तिच्या दोन्ही मुलींचा पूर्ण स्वीकार करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शिखरने २००९ मध्ये आयशाशी साक्षगंध आणि २०१२ मध्ये लग्नही केले. जरी जगाने त्यांना लाखो प्रश्न केले असले तरीही आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात कदाचित हे होणे शक्य आहे; पण शिखर आणि आयशा यांनी समाजाकडे दुर्लक्ष केले आणि एकमेकांची नावे कायमची जोडली.

शिखर हा आयशा आणि तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मुलींवरही आपल्या मुलाप्रमाणेच प्रेम करतो. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय तो आयशाला अनेकदा देतो; कारण आयशाशी लग्न केल्यावरच शिखर टीम इंडियाचा एक भाग झाला. याशिवाय आयशा आणि शिखर यांनाही एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला