जाणून घ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुढे कसे पोहचले आॕस्ट्रेलिया?

Australia & India

दुबई : कोरोनाच्या साथीमुळे विस्कळीत झालेल्या कसोटी क्रिकेटच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणांकन पध्दतीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने बदल केला आहे. कोरोनामुळे सामने व मालिका रद्द झाल्यानंतर संघांना समान संधी मिळावी यासाठी हा बदल करण्यात आला आहे. आता मालिका विजयासाठी गुणांऐवजी एकूण गूणांच्या टक्केवारीचा निकष लावण्यात आला आहे. त्यानुसार आता कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणवारीत आॕस्ट्रेलिया पहिल्या स्थानी पोहोचले आहे. या टक्केवारीआधारे अंतिम फेरीत कोणते दोन संघ पोहोचतील ते निश्चित होणार आहे. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेतील निवड समितीने केलेली शिफारस आयसीसीच्या मंडळाने मान्य केली आहे.

आतापर्यंत भारतीय संघ 360 गुणांसह पहिल्या स्थानी आणि 296 गुणांसह आॕस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी होते. भारताने आतापर्यंत खेळलेल्या चार मालिकांतून मिळू शकणाऱ्या कमाल 480 गुणांपैकी हे 360 गूण कमावले म्हणून भारताची टक्केवारी 75 टक्के झाली आहे. आॕस्ट्रेलियाने तीन मालिकांतून 360 पैकी 296 गूण कमावले आहेत म्हणून त्यांची टक्केवारी 82.2 टक्के होते. यामुळे आता नव्या गूणपध्दतीनुसार आॕस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानी आला आहे.

आयसीसीने म्हटलेय की जे सामने पूर्ण होऊ शकलै नाहीत ते अनिर्णित समजून उभय संघांना समान गूण जरी देण्यात येणार असले तरी अंतिम क्रमवारी ही पूर्ण खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या गुणांआधारेच ठरविण्यात येणार आहे.

खेळले गेलेले सामने आणि त्यातील गूण हे संघांच्या कामगिरीचे निदर्शक आहेत तर त्याचवेळी टक्केवारीमुळे जे संघ सामने खेळू शकले नाहीत ज्यात त्यांची काहीच चूक नव्हती, त्यांचेही नुकसान होणार नाही असे आयसीसीचे मुख्याधिकारी मनू साहनी यांनी म्हटले आहे.

या नव्या पध्दतीचा न्यूझीलंडला फायदा होणार आहे. त्यांनी मायदेशी वेस्ट इंडिज व पाकिस्तानविरुध्द मालिका जिंकल्या तर त्यांचे 600 पैकी 420 म्हणजे 70 टक्के गूण होतील. त्यामुळे सध्या चौथ्या स्थानी असले तरी ते त्यांच्या वरच्या स्थानावरील भारत व इंग्लंडच्या स्पर्धेत येतील. भारताला इंग्लंडविरुध्द पाच सामन्यांची आणि त्याच्याआधी आॕस्ट्रेलियाविरुध्द मालिका खेळायची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER