रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार ; उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला?

Kirit Somaiya-CM Thackeray

मुंबई  :  अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray)आणि वास्तू विशारद अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार (Financial transactions) झाले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले आहे.

यावरून सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव टाकरे (Uddhav Thackeray) यांना रोखठोक प्रश्न केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की, अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक, आज्ञा अन्वय नाईक, रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रविंद्र वायकर यांच्याबरोबर किल्ला कोर्लई येथील आजूबाजूची जमीन रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विकत घेतली. तेथून दोन किमीवर असलेलं देवदंडा ही माझी सासूरवाडी आहे. म्हणून या जागेचं महत्त्व माल कळतंय. 21 मार्च 2014 रोजी 2 कोटी 20 लाख रुपये ठाकरे परिवाराने नाईक परिवाराला दिले. अशाप्रकारचे किती व्यवहार झाले ते उद्धव ठाकरे सांगतील का? देवदंड माझी सासूरवाडी आहे. पण उद्धव ठाकरे यांनी तिथली जमीन विकत घेण्याचं कारण काय? किती जमिनी घेतल्या? एक गोष्ट मला समजत नाही, सातबाऱ्यावर संयुक्त नाव आहे.

एका बाजूला अन्वय मधूकर नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांची नाव आहेत. पण काही लोकं जमिनी घेतात. स्वत:ला राहण्यासाठी घर, जमीन विकत घेतात. पण रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रविंद्र वायकर हे दोघं का आणि कसे एकत्रित आले? ठाकरे, नाईक जमीन व्यव्हाराची चौकशी व्हायला हवी. ठाकरे आणि वायकर परिवाराचे संयुक्त किती व्यव्हार झाले आहेत? याची चौकशी व्हावी. अन्वय नाईक प्रकरण एवढं गाजत आहे, या प्रकरणात एवढी तत्परता करण्यामागील कारण समोर यायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER