ग्रामीण क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक; महाराष्ट्राला केंद्राकडून आर्थिक मदत; चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई : देशभरात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागालाही मोठा तडाखा बसला आहे. तसेच, मृतांचा आकडाही झपाटयाने वाढत आहे. परिणामी, ग्रामीण जीवनाची घडी विस्कटण्याचे दृश्य आहे. या संबंधित भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने (Modi govt) ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक रसद पाठवली आहे. सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना ८ हजार ९२४ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असून यातील ८६१ कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत.” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तर उत्तर प्रदेशला ४ हजार ४४१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाली आहे.

“महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्राचे वित्त मंत्री आणि ग्रामविकास मंत्री ही रक्कम लवकरात लवकर ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हाती सोपवतील अशी आशा आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील ग्राम पंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा १५व्या आर्थिक आयोगाच्या शिफारशीनुसार ते कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे विकत घेण्यासाठी आणि सुविधा सुदृढ करण्यासाठी वापरू शकतात.” असेही चंद्रकांत पाटील ट्विटच्या माध्यमातून म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button