केंद्राचा दिवाळी धमाका ; अर्थमंत्र्यांकडून ‘प्रोत्साहन पॅकेज’ची घोषणा

Nirmala Sitharaman

मुंबई :- दिवाळीपूर्वीच (Diwali 2020) नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारकडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) एका दिलासा पॅकेजची घोषणा करू शकतात. यात मागणीत वाढ होण्यासाठी तसंच छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश असू शकतो.

काही नव्या उपयांची आम्ही घोषणा करणार आहोत. तुम्ही याला ‘स्टीम्युलस पॅकेज’ (प्रोत्साहन पॅकेज) म्हणू शकता, असं सुरुवातीलाच अर्थमंत्र्यांनी म्हटलं. कोरोना (Corona) संक्रमण तेजीने घटताना तसंच अर्थव्यवस्था तेजीने सुरळीत होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

जीएसटी कलेक्शन वाढलंय. ऑक्टोबर महिन्यात वार्षिक १० टक्क्यांची वाढ झाली. बँक क्रेडीटमध्ये २३ ऑक्टोबरपर्यंत ५.१ टक्क्यांची वाढ झाली. परकीय चलन साठाही रेकॉर्ड स्तरावर आहे.

अगोदर मूडीजनं या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत ९.६ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. आता त्यांनी यात बदल करून ८.९ टक्के केलाय. याच पद्धतीनं २०२२ च्या अनुमानानुसार ८.१ टक्क्यांवरून वाढून ८.६ टक्के करण्यात आलाय. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत होत असल्याचं संकेत मिळत आहेत.

आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्याचं प्रदर्शन चांगलं राहिलं. याद्वारे २८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत रेशन कार्ड नॅशनल पोर्टेबिलिटी लागू करण्यात आली. यामुळे, ६८.६ कोटी लोकांना फायदा झाला. पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत १३७३.३३ कोटी रुपयांचे १३.७८ कर्ज देण्यात आले आहेत.

कोट्यवधी शेतकऱ्यांना किसान क्रेटिड कार्डाचा लाभ

६८ कोटी जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आलं. रब्बीच्या हंगामासाठी २५ हजार कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त यापूर्वी किसान क्रेडिट कार्डाची घोषणा करण्यात आली होती. १ कोटी ८३ लाख जणांनी यासाठी अर्ज केले होते. आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना याचे लाभ देण्यात आले असल्याचंही सीतारामन म्हणाल्या.

२ लाख कोटींचे पॅकेज जाहीर

बुधवारीच सरकारने १० क्षेत्रातील उत्पादकांसाठी २ लाख कोटी रुपयांचे प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह्स (पीएलआय) जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पीएलआय योजनेची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये औषध, ऑटोमोबाईल आणि ऑटो कंम्पोनंन्ट्स, दूरसंचार, नेटवर्कींग प्रोडक्ट्स, अॅडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल बॅटरीज, कपडे उद्योग, फूड प्रोडक्ट्स, सोलर मॉड्यूल, व्हाईट गुड्स आणि स्पेशालिटी स्टील सेक्टरला फायदा होणार आहे. देशात सध्या करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी करोनाचं संकट अद्यापही टळलं नाही. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतरही रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. तर अन्य काही शहरांमध्येही करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER