अखेर २२ प्रवाशांचा कोटा पूर्ण झाल्यावर धावली लालपरी

ST Bus

रत्नागिरी : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर जिल्ह्यांतर्गत बसेस सुरू करण्यास परवानी मिळाली; मात्र २२ प्रवासी भरल्याशिवाय एसटी सोडण्यात येणार नसल्याचे बोर्ड लावण्यात आल्याने, २२ प्रवाशांचा कोटा पूर्ण न झाल्याने रत्नागिरीमधून शुक्रवारी दुपारपर्यंत एकही बस सुटली नाही. मात्र, दुपारनंतर जिल्ह्यात अठरा फेऱ्या सोडण्यात आल्या. यामध्ये चिपळूण, देवरुख, लांजा, नाटे, जयगड तसेच राजापूर मार्गावरील फेऱ्यांचा समावेश होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

 

MT LIKE OUR PAGE FOOTER