अखेर तृतीयपंथीय हत्याकांडाचा उलगडा; चौघे अटकेत

तृतीयपंथी

मुंबई : मुंबईतील गोरेगाव भागात काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयाची दिवसाढवळ्या हत्या झाली. या हत्याकांडातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) झोन-११ चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी ही कारवाई केली आहे. या तृतीयपंथीयाची २४ फेब्रुवारीला हत्या करण्यात आली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास याचा खून करण्यात आला. या तृतीयपंथीयांना मारण्यासाठी हातोडीसह धारदार हत्यारांचा वापर केला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी मृत व्यक्तीला ओळखणारे आहेत. तसेच हे आरोपी आजूबाजूच्या भागात राहात होते. या आरोपींचे मृत व्यक्तीसोबत छोट्याछोट्या कारणांवरून सतत वाद व्हायचे. याच कारणाने तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली, असा अंदाज पोलिसांना आहे. याआधीही आरोपींनी दोन-तीन वेळा तृतीयपंथीयाची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बुधवारी २४ फेब्रुवारीला सूर्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

सूर्या हा तृतीय पंथाचा गुरू होता. अनेक व्यक्तींना तो मदतही करत होता. या हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. धीरज राम भूषक विश्वकर्मा (२०), विनायक राजाराम यादव (२२) आणि राजेश राजकुमार यादव (२३) अशी तिघांची नावे आहेत. तसेच यात एका १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER