अखेर ठाकरे सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गुंडाळली, हे सरकार मराठवाड्याच्या मुळावर उठले आहे- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात

Uddhav Thackeray - Marathwada Water Grid Scheme - Babanrao Lonikar

मराठवाडयात (Marathwada) सर्व जिल्हे आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या जिवणात पिण्याच्या पाण्याचे आठराविश्व दारिद्रय दुर व्हावे आणि सर्वांना मुबलक पाणी मिळावे, हे लक्षात घेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणविस (Devendra Fadnavis), तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तत्कालीन सरकारने मराठवाडा वॉटर ग्रिड योजणा (Marathwada Water Grid Scheme) मंजूर केली होती या योजनेमुळे मराठवाड्यातील उद्योगाला शेतीला आणि सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार होती परंतु आता ही योजना बंद केल्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ पूर्णपणे संपविण्याचे देवेंद्र फडणवीस सरकारचे स्वप्न अपूर्ण राहणार असून विद्यमान महा विकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) ही योजना बंद करून मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत एवढेच नाही तर महा विकास आघाडी सरकार मराठवाड्यातील जनतेच्या मुळावर उठले आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धरणे पाईपलाईनद्वारे ऐकमेकाला जोडून दरी डोंगर त्यात , वस्ती तांडयावर पाणी देणारी अभिनव योजणा ठाकरे सरकारने जुजबी कारण दाखवत गुंडाळली असून कामाच्या निविदा थंड बसत्यात गुंडाळून ठेवल्या आहेत. केवळ राजकिय द्वेषापोटी सरकारने जनतेच्या तोंडी आलेले पाणी थांबवण्याचे महापाप महा विकास आघाडी सरकारने केली असल्याची टीका देखील यावेळी लोणीकर यांनी केली

सरकार बदल्या नंतर राजकिय द्वेषातून योजणा ठाकरे सरकारने मागे टाकली . व्यवहार तपासण्याचा नावा खाली अगदी वर्ष लोटले तरी गुंडाळून ठेवलेल्या निवीदा धुळ खात पडल्या .परिणामी सरकारने योजणा गुंडाळून टाकली अस म्हटले तर वावगे नाही . फडणविस मुख्यमंत्री असतांना आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर त्या खात्याचे मंत्री असताना मराठवाडा वॉटर ग्रीड अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना मंजूर केली होती या योजनेमुळे संपूर्ण मराठवाड्याचे भाग्य बदलेल अशी आशा अभ्यासकांना होती. परंतु दुर्दैवाने महा विकास आघाडी सरकारने यात राजकारण करून केवळ फडणवीस सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेली योजना राजकीय द्वेषापोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला ही बाब मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून मराठवाड्यातील जनता महाविकास आघाडी सरकारमधील सर्वच पक्षाच्या नेतृत्वाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टीका देखील लोणीकर यांनी केली

इझायल कंपनीमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या योजणेचे जिल्हानिहाय टेंडर काढले होते. त्यामध्ये औरंगाबाद जालना बीड लातूर आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्याचे टेंडर प्रसिद्ध झाले होते तर परभणी हिंगोली व नांदेड या तीन जिल्ह्याचे टेंडर पूर्णपणे तयार होते त्यासाठी लागणारा 20 हजार कोटीपेक्षा अधिक खर्च मंजूर झाला होता. मराठवाड्यात एकूण 11 मोठी धरणे बंद जल वाहणी द्वारे ऐकमेकांना जोडून दुस्काळी भागात पाणीपुरवठा होईल असा अराखडा तयार झाला होता. या योजणेत 1,330 लांब मुख्य जलवाहणी आहे. 3,220 किमी जलवाहिनी प्रत्येक तालूक्यात पाणी देण्यासाठी होती. योजणेचा एकूण खर्चा पैकी 10,595 कोटीचा पहिला टप्पा आर्थीक तरतूद केलेली होती. तर 3,855 कोटी अशुध्द पाणी मुख्य जलवाहणी साठी होते. केवळ पिण्याचे पाणि नाही तर शेती आणि उदयोगाला लागणारे पाणी नियोजण यात होते. खर तर हि योजणा मराठवाडयातील सामान्य जनता शेतकरी यांच्यासाठी वरदान ठरणारी च होती. मात्र सरकार बहलताच महा विकास अघाडीच्या सरकारने जनतेच्या तोंडचे पाणी काढताना योजनाच गुंडाळली आहे. याची भिती होती म्हणुनच माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पाणी प्रश्नावर संभाजीनगरला एक दिवशाचे उपोषण केले होते. खतही योजना तांत्रिक दृष्ट्याा योग्य नाही अशा वल्गना विद्यमान सरकारमधील अनेक नेत्यांनी केल्या होत्या परंतु प्रत्यक्षात कोणतीही शहानिशा केली नाही केवळ राजकीय द्वेषापोटी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले

मराठवाडयाला क्रिडा विद्यापिठ फडणविसांनी मंजूर केल पण ठाकरे सरकार येताच रात्रीतून पुण्यात हलवले . हे सरकार मराठवाडयातील जनतेवर राजकिय सुड उगवत असून विकासाचा योजणा बंद करणे म्हणजे या विभागाला विकासापासून वंचित ठेवणे असा आहे. मराठवाडयात सरकारचे पाच मंत्री आहेत .एकही मंत्री या प्रश्नावर बोलत नाही हे दुर्देव म्हणावे अशा शब्दात लोणीकर यांनी महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER