शिवसेनेच्या लढ्याला यश; कर्नाटकातील पिरणवाडीत ‘शिवाजी महाराज चौक’ नामकरण

Shivaji Maharaj Chowk in Piranwadi - Shivsena

मुंबई : बेळगावजवळच असलेल्या पिरणवाडी गावात शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) पुतळ्यासमोर संगोळी  रायण्णा   यांचा पुतळा बसवण्यावरून एका नव्या वादाला सुरुवात झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रायन्ना यांचा पुतळा बसवल्यावरून रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांवर (Marathi Language) पोलिसांनी लाठीमार केला होता. या प्रकरणावर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्यावतीने  (Shivsena) थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा (B.S. Yeddyurappa) यांना खरमरीत पत्र दिले होते. अखेर शिंदे यांच्या पत्राची दखल घेण्यात आली आहे.

बेळगाव जिह्यात पिरणवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामुळे चौकाचे पूर्वीप्रमाणेच ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच क्रांतिवीर संगोळी  रायण्णा   यांचा काल रात्री बेकायदेशीरपणे बसविलेला पुतळा आहे, त्याच ठिकाणी नव्याने प्रतिष्ठापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिरणवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यासमोरच कानडी संघटनांनी क्रांतिवीर रायण्णा यांचा पुतळा बसविल्याने वाद निर्माण झाला होता.

यावर रात्री उशिरा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची शांतता बैठक घेण्यात आली. यासाठी राज्याचे एडीजीपी अमरकुमार पांडे विशेष विमानाने दाखल झाले होते. दोन्ही गट निर्णयावर ठाम असल्याने एडीजीपी पांडे यांनी सन २०१६च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही महापुरुषाचा पुतळा, प्रार्थनास्थळ बांधता येणार नसल्याची कायदेशीर बाब सांगून, संमतीने तोडगा काढण्याची सूचना केली. चर्चेअंती ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे नामकरण करणे, तसेच रायण्णा यांचा पुतळा त्याच ठिकाणी नव्याने प्रतिष्ठापित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही बातमी पण वाचा : मुखवटा बदलून जनाधार लुटणारी राष्ट्रवादी हे काँग्रेसचेच अपत्य – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER