अखेर राष्ट्रवादीने घेतला देशमुखांबद्दल निर्णय; एप्रिलमध्ये महाविकास आघाडीत खांदेपालट ?

Anil Deshmukh - Sharad Pawar - Maharashtra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या पत्रामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजपाकडून (BJP) सतत देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. परंतु, अखेर आता राष्ट्रवादीने (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात लवकरच मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे. एप्रिल महिन्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) खांदेपालट होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाल्यामुळे राष्ट्रवादी अडचणीत आली आहे. विरोधकांनी अनिल देशमुख यांची मागणी लावून धरली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे राजीनामा घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. पण, अखेर आता राष्ट्रवादीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एप्रिल महिन्यात खांदेपालट होणार आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गृह खात्यात बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER