अखेर वैद्यकीय परीक्षाही लांबणीवर; अमित देशमुखांचा निर्णय; सुप्रिया सुळेंनी मानले आभार!

Amit Deshmukh - medical examination postponed - Maharastra Today
Amit Deshmukh - medical examination postponed - Maharastra Today

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी हा निर्णय घेतला. १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला आहे. राज्यसह देशभरातील विविध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर हालचाली झाल्या आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीदेखील ट्विट करत परीक्षांबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी अमित देशमुख यांना योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली. यानंतर अमित देशमुख यांनी ७२ तासांत यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.

“सुमारे ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. एकंदर ही परिस्थिती लक्षात घेत व विद्यार्थी व इतर घटकांशी संवाद साधून सरकारने हा सर्वसमावेशक निर्णय घेतला, याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबद्दल सुळेंनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचेही मनापासून आभार मानले. वैद्यकीय शाखेचे अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते.” असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button