अखेर मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंची मागणी मान्य, परप्रांतीयांची नोंदणी करण्याचे आदेश

Maharashtra Today

मुंबई :- महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाला राज्यात येणारे परप्रांतीय मजूरच (Migrant Workers) जबाबदार आहे. त्यामुळे इतर राज्यातून येणाऱ्या मजुरांची कोरोना तपासणी आणि त्यांची नोंदणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. राज ठाकरे यांच्या या मागणीची दखल घेत आता महाराष्ट्रात परतणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर येणाऱ्या सर्व परप्रांतीय मजुरांची नोंदणी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारने खबरदारी म्हणून मजुरांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत परतले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र, ते आपल्यासोबत कोरोनाचे विषाणू तर आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत ते व्यर्थ जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणेकरुन त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंचे आवाहन; मुख्यमंत्री निधीत मानधन जमा करण्याची नांदगावकर यांची घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button