नटराजनच्या एका धावेनेही केले विक्रम…!

T. Natarajan

कुणाच्या पाच पन्नास धावांनीही विक्रम होत नाहीत, त्या रुटीन धावा असतात आणि काहीच्या फक्त एका धावेनेसुध्दा विक्रम होत असतो. गोलंदाजीत चमकलेला टी. नटराजन (T. Natarajan) हा या नंतरच्या गटात येतो. त्याने ब्रिस्बेन कसोटीत नऊ चेंडूत फक्त एक धाव केली आणि तो नाबाद परतला मात्र ही एक धाव करतानाही त्याने विक्रम केला कारण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या 8 सामन्यांच्या 11डावांतील त्याची ही पहिलीच धाव होती. याआधी त्याने घेतलेली शेवटची धाव डिसेंबर 2018 मधील होती. म्हणजे या पठ्ठ्याने 2019 व 2020 अशी तब्बल दोन वर्ष प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकसुध्दा धाव केली नव्हती.

त्याचे मागचे 11 डाव (सर्वात ताजा आधी) असे…नाबाद 1, 0, नाबाद 0, नाबाद 0, 0, 0, 0, नाबाद 0, नाबाद 0, नाबाद 0 आणि 0. यातले चार डाव हिमाचल प्रदेशविरुध्दचे आहेत. यादरम्यान आणखी तीन डाव असे होते ज्यात त्याला फलंदाजीसाठी मैदानात उतरावेच लागले नव्हते.

आजसुध्दा त्याने धाव केली नसती तर मार्क रॉबिन्सनचा विक्रम धोक्यात होता. मार्क रॉबिन्सनने (Mark Robinson) 1990 मध्ये तब्बल 12 सलग डावात धावांची बोहोनीसुध्दा केली नव्हती. तशा प्रथम श्रेणी कारकिर्दीत नटराजनच्या नावावर आता 21 सामन्यात 29 धावा आहेत त्यात 12 धावांची त्याची सर्वोच्च खेळी आहे.

टी. नटराजनच्या 10 डावानंतरच्या पहिल्या धावेने अजीत आगरकरच्या (Ajit Agarkar) आठवणी ताज्या केल्या.आगरकरही 1999 च्या काळात सलग सात वेळा शून्यावर बाद झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER