शिवसेनेला धक्का : अखेर महेश कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; शरद पवारांची माहिती

Sharad Pawar & mahesh kode

मुंबई :- अखेर शिवसेनेचे (Shivsena) नेते महेश कोठे (Mahesh Kode) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  (NCP)  प्रवेश केला आहे. महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले. यासंदर्भांत स्वतः पवारांनी ट्विट केले आहे.

सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सहकाऱ्यांसोबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांचे पक्षात व महाविकास आघाडीत मन:पूर्वक स्वागत.- असे ट्विट पवारांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांकडून मंत्र्यांचा क्लास, मंत्र्यांकडून जाणून घेतला कामांचा लेखाजोखा

सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक महेश कोठे हे अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा आहे. कोठे यांचा आज शुक्रवार (८ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार होता. मात्र शिवसेनेच्या सूचनेनंतर महेश कोठे यांचा पक्षप्रवेश थांबवण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER