अखेर कल्याण काळे राष्ट्रवादीत, अजितदादा म्हणाले…भालकेंच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण ताकद लावू

Maharashtra Today

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या अकाली निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून भरात भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके याना उमेदवारी देण्यात आली असून आजपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. अवघ्या दोन वर्षांतच काळेंनी भाजपला रामराम ठोकला हे विशेष.

यावेळी बोलताना कल्याण काळे यांनी “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता” अशी टोलेबाजीही केली. विठ्ठल परिवार एकत्र असला पाहिजे. भविष्यात परिवाराची ताकद विरोधकांना दाखवली पाहिजे. परिवार एकत्र आला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता. आता जिल्हा सगळा राष्ट्रवादीमय करणार. पवार साहेबांची ताकद कायम स्वरुपी आमच्या पाठीशी असते. इथून पुढच्या काळात कायम स्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार असं कल्याणराव काळे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार आहे.

दरम्यान, या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनीही भारत भालके यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द दिला. कल्याण काळेंच्या मदतीने दिवंगत भारत भालके यांचे स्वप्न करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावू. सध्या राज्यात कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. विकासाचा निधी आरोग्य यंत्रणेवर खर्च करावा लागत आहे. मात्र मी उपमुख्यमंत्री असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. शरद पवारांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार या भागाचा विकस करण्यास मी कटिबद्ध आहे. भगीरथ भालकेंना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावू. त्यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button