अखेर अनिल कपूरने माफी मागितली

Anil Kapoor

बॉलिवुडमधील (Bollywood) सिनेमांमध्ये समाजातील एखाद्या समूहाचा किंवा संस्थेचा अनादर केला जातो आणि नंतर त्याविरोधात आवाज उठवला की, लगेच माफी मागून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय नेते, पोलीस, वकील यांच्यासोबत गेल्या काही काळापासून आपल्या संरक्षण दलातील विविध सैन्यदलांचा अपमान करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. अनिल कपूरच्या (Anil Kapoor) एका आगामी चित्रपटातही अशाच प्रकारे वायुसेनेचा (Indian Air Force) अपमान केल्याचे प्रकरण समोर आले आणि त्याविरोधात आवाज उठवला जाताच अनिल कपूर माफी मागून मोकळा झाला आहे. सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी निर्माते कलाकार असा खेळ खेळतात पण त्यामुळे आपल्या सैन्यदलांची इमेज खराब होते त्याकडे कोणीही लक्ष देत नाही,

अमेरिकन कंपनी नेटफ्लिक्सने (Netflix) अनिल कपूर आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांना घेऊन एके व्हर्सेस एके नावाचा एक सिनेमा तयार केला आहे. हा सिनेमा लवकरच प्रसारित केला जाणार आहे. या सिनेमात वायुसेनेचा अपमान करण्यात आला आहे. सिनेमाच्या एका दृश्यात वायुसेनेच्या अधिकाऱ्याचे कपडे घातलेला अनिल कपूर अत्यंत वाईट शब्द वापरताना दिसत आहे. अनिल कपूरच्या या वक्तव्यावर वायुदलाने आक्षेप घेतला आणि नेटफ्लिक्सलाही नोटीस पाठवली. अनिल कपूरने वायुदलाचा आक्षेप घेऊन एक व्हीडियो जारी करीत माफी मागितली आहे. परंतु सिनेमातून हे दृश्य वगळणार की नाही हे मात्र निर्मात्यांनी अजून स्पष्ट केलेले नाही.

ही बातमी पण वाचा : अनिल कपूर आणि अनुराग कश्यपमध्ये ट्विटर वॉर

बुधवारी वायुदलाने सिनेमाच्या ट्रेलरची एक क्लिप ट्वीट करीत निर्मात्यांना भारतीय वायुदलाचे कपडे घातलेल्या व्यक्तीकडून होत असलेली हरकत योग्य नसून हे दृश्य त्वरित काढून टाका असे निर्देश दिले. यापूर्वी करण जोहरने ‘गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’ सिनेमातही भारतीय वायुदलाचे चुकीचे दर्शन घडवले होते. तेव्हा भारतीय सैन्य दलाने सेंसॉर बोर्डाला पत्र पाठवून सिनेमात भारतीय सैन्यदलाची बदनामी होते त्यामुळे सैन्यदलाचे चित्रण असलेला चित्रपट आम्हाला दाखवून नंतरच मंजूर करावा म्हटले होते. वायुदलाने आक्षेप घेतल्यानंतर नेटफ्लिक्सने संबंधित दृश्याचा वायुदलाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मात्र अनिल कपूरने एक व्हीडियो जारी करीत ते दृश्य वायुदलाचेच असून त्यासाठी मी माफी मागतो असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER