अखेर नागपुरात जनता कर्फ्यूची घोषणा

Nagpur Janta Curfew

नागपूर :  महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर (Nagpur)शहरात कोरोनाने हाहाकार केला आहे. कोरोनाबाधित (Corona) रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

नागपुरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अखेर नागपुरचे महापौर संदीप जोसी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दर शनिवार रविवार जनता कर्फ्यू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या शनिवार-रविवारी आणि पुढल्या आठवड्यात जनता कर्फ्यूचं राहणार असल्याची घोषणा महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनीकेली आहे.

नागपूर महानगर पालिका (NMC)आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हा निर्णय जाहीर केला आहे.

काय बंद राहणार –

या दोन दिवसांच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. किराणा, भाजी आणि डेअरी तसंच जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील. शनिवार आणि रविवारची परिस्थिती बघून भविष्यातील इतर निर्णय घेण्यात येतील असे महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपुरात कोरोनाचे 13608 नवे रुग्ण सापडलेत. धक्कादायक म्हणजे, 8 सप्टेंबरला एका दिवसात नागपूर जिल्ह्यात 2205 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर 37 रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. ते मार्च महिन्याच्या तुलनेत 10 पटीत तर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. त्यामुळे वाढत्या चाचण्यांसह नागपुरात रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे तर्क मान्य केले तरी दर शंभर चाचण्यांमागे कोरोना बाधितांची संख्या वाढणे ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER