शिवाजी विद्यापीठाच्या १ ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा

Shivaji University Kolhapur

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन 15 सप्टेंबरपासून, तर लेखी परीक्षा 1 ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतचा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर विद्यापीठ परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रक समिती, परीक्षा मंडळ सदस्य व अधिष्ठाता यांच्या दोन बैठका झाल्या.विद्या परिषदेची कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन बैठक झाली. परीक्षेसंदर्भात दोन समित्या नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडून परीक्षेबाबत सर्व गोष्टींचे नियोजन केले जाणार आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. अंतिम वर्षांच्या शेवटच्या सत्राच्या 220 हून अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातून 75 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER