अखेर पंच धर्मसेना यांनी विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील चूक केली मान्य

Dharmasena

नवी दिल्ली : आयसीसीवर्ल्ड कप-२०१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडने बाजी मारली, पण मन जिंकली ती न्यूझीलंडने. विश्वचषक संपल्यावर पंच धर्मसेना यांनी मात्र आपली ही चूक मान्य केली आहे. या अंतिम सामन्यात टीकेचे धनी पंच ठरले होते. या सामन्यात पंचांकडून मोठ्या चुका झाल्या आणि याचा सामन्याच्या निकावरही परीणाम झाला. पंचांकडून झालेल्या चुकांमुळे इंग्लंडला विजय मिळविता आला.

विश्वचषकाचा अंतिम सामना रंगात आला असताना बेन स्टोक्सने एक फटका मारला. हा फटका मारून तो दोन धावा घेण्यासाठी पळत सुटला. दुसऱ्या धावेसाठी माघारी फिरत असताना त्याच्या दिशेने मार्टिन गप्तिलने थ्रो केला. त्यावेळी स्टोक्सच्या बॅटला लागून चेंडू सीमारेषे पार गेला. त्यावेळी इंग्लंडला सहा गुण बहाल करण्यात आले. त्यावेळी चाहते पंचांवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाली.

याबाबत पंच धर्मसेना यांनी सांगितले की, ” आता टीव्ही रीप्ले पाहिल्यावर माझ्याकडून चूक झाली हे मला कळून चुकले आहे. पण मैदानात मात्र टीव्ही रीप्ले पाहता येऊ शकत नव्हते. मैदानात मी जे निर्णय घेतले त्याचे मला वाईट वाटत नाही. त्यावेळी मी जे निर्णय घेतले त्यावर आयसीसीही नाराज नव्हती.”

क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सर्वात महत्वाचा निर्णय ठरला होता तो ‘ओव्हर थ्रो’वर इंग्लंडला बहाल करण्यात आलेल्या सहा धावा. या सहा धावांमुळे इंग्लंडचा संघ विजयासमीप पोहोचला होता. पण अंतिम फेरीतील हा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. त्यामुळेच हा ‘ओव्हर थ्रो’चा नियम बदलण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.