पोलीस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा अंतीम टप्प्यात

Police Regional Sports Competition

सांगली : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा अंतीम टप्यात आली असून बुधवारी दिवसभरात महिला आणि पुरुष गटांतील वयक्तिक खेळ प्रकारांची स्पर्धा चुरशीची झाली. सर्व क्रीडा प्रकारात परिक्षेत्रातील पाच पोलीसदलांमध्ये चुरस असल्याचे दिसत असून या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या जिल्हा पोलीस दलाकडे जातेय, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

बुधवारी पार पडलेल्या तिहेरी उडी स्पर्धेत सातारच्या प्रविण पोळ याने प्रथम तर सांगलीच्या संतोष माळीने द्वितीय क‘मांक पटकावला. कोल्हापूरच्या सुरज चव्हाण याला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. भालाफेकीत सातारच्या अर्जुन शिरतोडेने बाजी मारली. कोल्हापूरचा अजितगुरवने दुसरे तर सोलापूर ग्रामीणच्या रहिम मुलाणी तृतीय स्थान पटकाविले. 110 मीटरच्या अडथळा शर्यतीत कोल्हापूरच्या अमृत तिवलेने प्रथम स्थान पटकाविले. कोल्हापूरच्याच विशाल माळीने द्वितीय स्थान तर सांगलीच्या अभिजीत पाटील तृतीय स्थान मिळवले. पाच हजार मीटर धावण्याची स्पर्धा कोल्हापूरच्या सिध्देश्वर रायगोंड यांनी जिंकली . द्वितीय आणि तृतीय स्थान अनुक्रम सातारच्या दत्तात्रय काळे, रामदास बेडकोळी यांनी पटकाविले.

महिलां गटातील भाला फेकीची स्पर्धा पुणे ग्रामीणच्या प्रियांका दरेकर हिने जिंकली. द्वितीय आणि तृतीय स्थान सांगलीच्या साधना शेडगे, प्रियांका जाधव यांनी मिळवले. 110 मीटर अडथळ्याची शर्यत सांगलीच्या सुनिता पाटील ने जिंकली.द्वितीय स्थान सांगलीच्याच प्रियांका जाधवने पटकाविले तर सोलापूर ग्रामीण च्या माशाबी शेखला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. पाच हजार मीटर धावण्याची स्पर्धा कोल्हापूरच्या शोभा खरातने जिंकली. सातारच्या प्रणाली संके द्वितीय तर सोलापूरच्या पुजा करडे तृतीय स्थानावर राहिल्या.