सरसकट शाळा सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल- वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad.jpg

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सर्व शाळा बंदमुळे मुले घरात आहेत. शाळा बंद शिक्षण सुरू असले तरी अनेक पालक आणि विद्यार्थी आता शाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. परंतु, शाळा सध्याच सुरू होणार नाहीत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री (School Education Minister) वर्षा गायकवाड यांनी दिली. त्या म्हणाल्या, “सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यातच अनेक शाळांचा वापर हा विलगीकरणासाठी केला जात आहे. अनेक शिक्षकांना कोविडच्या ड्युटीवर नेमण्यात आलं आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी आम्हाला खूप तयारी करावी लागेल. त्यामुळे सरसकट शाळा सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. ” असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्या नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली होती. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता इतक्यात शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत घेतली.

केंद्र सरकारच्या २१ सप्टेंबरनंतर शाळा सुरू करण्याच्या सूचनेवर चाचपणी करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही पसरत असल्याने २१ सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवण्यास पालकही तयार होणार नाहीत, निवासी शाळा सुरू करणे तर अत्यंत धोक्याचे ठरेल. असा विचार बैठकीत झाला. त्यामुळे पुढे येणारा दसरा, दिवाळी पाहता आणखी दोन महिने तरी विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार नाही. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER