चित्रपट सोडण्याची चुक केलेल्या पाच नायिका

Kareena Kapoor - Kangana Ranaut - Aishwarya Rai Bachchan - Katrina Kaif - Kajol

नायक, नायिका मग त्या कोणत्याही भाषेतील असोत, त्यांची नेहमी इच्छा असते की, त्यांना चांगल्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली पाहिजे. यासाठी जेव्हा चित्रपटाची ऑफर या कलाकारांकडे येते तेव्हा ते चित्रपटाचे कथानक आणि आपली भूमिका अगोदर बघतात. त्यासोबतच निर्माता आणि दिग्दर्शक कोण आहे याचाही विचार ते करतात. कारण चित्रपटाची कथा चांगली असली तरी तो पूर्ण होऊऩ प्रदर्शित होणे आवश्यक असते. इतकी काळजी घेऊनही अनेक कलाकारांनी त्यांना ऑफर झालेले चित्रपट सोडले. दुसऱ्या कलाकारांनी ते चित्रपट केले आणि ते यशस्वी झाले तेव्हा मात्र चित्रपट सोडलेल्या कलाकारांना आपल्या चुकांची जाणीव झाली. अशाच चुका केलेल्या काही नायिका पुढीलप्रमाणे आहेत.

करीना कपूर (Kareena Kapoor)

करीना कपूरच्या आयुष्यात असे अनेक चित्रपट आले जे तिने सोडले आणि तिला नंतर पश्चाताप झाला. यात सर्वात पहिला चित्रपट आहे कहो ना प्यार है. राकेश रोशनने आपल्या मुलाला ऋतिकला लाँच करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली. करीना नायिका होती आणि एक गाणेही तिच्यावर चित्रित करण्यात आले होते. परंतु त्याच दरम्यान तिला अभिषेक बच्चनला लाँच करणारा रिफ्यूजी ऑफर झाला आणि तिने कहो ना प्यार है सोडला. तिच्या जागी आली अमिषा पटेल. कहो ना प्यार है सुपरहिट झाला आणि रिफ्यूजी फ्लॉप.

पहिल्याच चित्रपटापासून करीनाने चुका करण्यास सुरुवात केली होती. संजय लीला भंसाळीने करीनाला हम दिल दे चुके सनमची ऑफर दिली होती. परंतु करीना तेव्हा शिकत असल्याने तिने हा चित्रपट नाकारला. तिच्या जागी ऐश्वर्या राय आली आणि चित्रपटाने इतिहास रचला. 2013 मध्ये संजय लीला भंसालीने पुन्हा एकदा करीनाला गोलियों की रासलीला रामलीला ऑफर केला. परंतु करीनाने रामलीला साईन करण्याऐवजी प्रकाश झा यांचा सत्याग्रह चित्रपट साईन केला. या चित्रपटात मोठे मोठे कलाकार असल्याने करीनाने या चित्रपटाला प्राधान्य दिले. संजय भंसालीने दीपिका पदुकोन घेतले आणि तिला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. एवढेच नव्हे तर 2003 मध्ये करण जोहरनेही करीला कल हो ना हो ऑफर केला होता. परंतु करणने योग्य पैसे न दिल्याने करीनाने तो चित्रपट सोडला. तिच्या जागी प्रीति झिंटा आली आणि तिलाही त्यावर्षीचा बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला. मधुर भांडारकरचा फॅशन नकारात्मक भूमिका असल्याने आणि केवळ अभिषेक बच्चनबरोबर काम करायचे नाही म्हणून दोस्ताना चित्रपट करीनाने सोडले. प्रियांका चोप्राने हे दोन्ही चित्रपट केले आणि ती स्टार झाली.

कंगना रनौत (Kangana Ranaut)

कंगना रनौतनेही आपल्या आयुष्यात अशा काही चुका केल्या आहेत. मिलन लुथरियाने डर्टी पिक्चरची सर्वप्रथम ऑफर कंगनाला दिली होती. परंतु कंगनाने तो चित्रपट सोडला आणि विद्या बालनच्या झोळीत पडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर कमाई केलीच विद्याला अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)

ऐश्वर्या जेव्हा मिस वर्ल्ड होऊन बॉलिवुडमध्ये नायिका बनण्यास तयार झाली तेव्हा आमिर खानसोबतच राजा हिंदुस्तानीमध्ये काम करण्याची ऑफर तिला देण्यात आली होती. परंतु आमिर खानऐवजी ऐश्वर्याने धर्मेंद्र पुत्र बॉबी देओलसोबत और प्यार हो गयामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. राजा हिंदुस्तानी हिट झाला आणि और प्यार हो गया फ्लॉप. तर राजा हिंदुस्तानीमध्ये काम करून करिश्मा कपूर मात्र रातोरात स्टार झाली. मधुर भांडारकरनेही अगोदर करीना आणि नंतर ऐश्वर्याला फॅशन चित्रपटाची ऑफर दिली होती. खरे तर हा चित्रपट ऐश्वर्यासाठी अत्यंत योग्य होता. परंतु तिने नकार दिला आणि प्रियांकाने तो केला. पुढचा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे. विधु विनोद चोप्रा निर्मित आणि प्रदीप सरकार द्वारा दिग्दर्शित परिणीतासाठीही सर्वप्रथम ऐश्वर्यालाच विचारण्यात आले होते. पण तिने नाही म्हटले. तिच्या जागी आली विद्या बालन. चित्रपट सुपरहिट झाला होता.

कॅटरीना कैफ (Katrina Kaif)

Katrina Kaif keeps it chic in an all white lace Rasario outfit: Yay or Nay?  | PINKVILLAकॅटरीनाचेही असेच काही निर्णय चुकले आहेत. 2011 मध्ये अनुराग बसुने रणबीर कपूर नायक असलेल्या आपल्या वेगळ्या बरफी चित्रपटासाठी कॅटरीनालाच प्रथम विचारले होते. मात्र तिने नकार दिला. तिच्या जागी आली प्रियांका चोप्रा. प्रियांकाच्या खात्यात एका वेगळ्या चित्रपटाची भर या चित्रपटाने टाकली. रणबीर कपूरच्याच रॉकस्टारमध्येही कॅटरीनाची जोडी बनवण्याचा विचार होता. परंतु कॅटरीनाने चित्रपट नाकारला. नरगिस फाखरीने तिची जागा घेतली. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. एवढेच नव्हे तर दबंग 2 मध्ये सलमान खानने कॅटरीनाला एका आयटम साँगची ऑफर दिली होती. पंरंतु तिच्याकडे वेळ नसल्याने करीनाने मुन्नी बदनाम हुई आयटम साँग केले. या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

काजोल (Kajol)

राजू हिरानीने आपल्या महत्वाकांक्षी 3 इडियट्ससाठी काजोलची निवड केली होती. आमिरच्या नायिकेच्या रुपात काजोल यात दिसणार होती. भूमिकाही तिला डोळ्यासमोर ठेऊनच लिहिली होती. काजोल त्यावेळी माय नेम इज खानच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तिने हा चित्रपट नाकारला होता. तिच्या जागी आली करीना कपूर. चित्रपट सुपरहिट झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER