अक्षरधाम मंदिर हल्ल्यावरही आता चित्रपट

akshardham

देशात घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या घटना, दहशतवादी हल्ल्याच्या घटना, अंडरवर्ल्डचे जग हे बॉलिवूडकरांचे (Bollywood) आवडते विषय. त्यामुळेच दाऊदपासून 26-11 हल्ल्यापर्यंतचे विषय चित्रपटात आलेले आहेत. अगदी पुलवामा हल्ल्यावरही उरीसारखा यशस्वी चित्रपट तयार झाला. या यादीत आता गुजरामधील अक्षरधाम मंदिरावर (Akshardham temple )झालेल्या हल्ल्यावर आधारित चित्रपटाचीही भर पडणार आहे.

12 वर्षांपूर्वी म्हणजे 24 सप्टेंबर 2002 ला गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 30 पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाला होता आणि 80 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले होते. अक्षरधामवरील हल्ल्यावर चित्रपट बनवण्याचा विचार आतापर्यंत कोणीही केला नव्हता. परंतु आता ‘स्टेट ऑफ सीज : 26/11’ च्या निर्मात्यांनी ‘स्टेट ऑफ सीज : अक्षरधाम’ चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. चित्रपटातील कलाकार आणि अन्य तंत्रज्ञांची लवकरच निवड केली जाणार असून पुढील वर्षी चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER