सुशांत सिंगच्या जीवनावरील चित्रपटाचा वाद हायकोर्टात

  • प्रदर्शनास मनाईसाठी अपील दाखल

मुंबई : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या जीवनावरील ‘न्याय, दि जस्टिस’ या नियोजित चित्रपटाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. नगर दिवाणी न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनास मनाई करणारा आदेश दिल्यानंतर त्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे.

स्वत:ला सामाजिक  कार्यकर्ता म्हणविणाºया मनिष जामदार मिश्रा यांनी या चित्रपटाच्या निर्मात्या सरला सरोगी यांच्याविरुद्ध नगर दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून त्यात ‘नोटिश आॅफ मोशन’व्दारे अंतरिम मनाईची विनंती केली होती. दिंडोशी, बोरिवली येथील नगर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. साळवे यांनी मिश्रा यांची ही विनंती २२ डिसेंबर रोजी फेटाळली होती.

मिश्रा यांनी त्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. दोन दिवसांपूर्वी न्या. पृथ्वीराज के. चव्हाण यांच्यापुढे हे अपील आले असता, या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यासारखे काही नाही, असे नमूद करून सुनावणी मार्चच्या पहिल्या आाठवड्यात ठेवण्यात आली.

मिश्रा यांचे म्हणणे असे आहे की, त्यांची सुशांत सिंग राजपूत व राज्यातील आत्ताच्या सत्ताधारी सरकारशी भावनिक जवळिक आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूचा तपास ‘सीबीआय’ करत असून अद्याप कोणताही निष्कर्ष त्यातून निघालेला नाही. अशा परस्थितीत सुशांत सिंगच्या मृत्यूच्या संदर्भात राज्य सरकारने काहीच केले नाही, असे चित्र या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे जाण्याने सुशांत सिंगचा निस्सिम चाहता या नात्याने माझी स्वत:ची व राज्यातील सत्ताधारी सरकारची अपरिमित होनी होणार आहे..

याच्या उलट सरोगी यांच्यावतीने मांडलेले मुद्दे मान्य करून दिवाणी न्यायालयाने म्हटले होते की, एक तर मिश्रा यांचे या प्रकरणात काही व्यक्तिगत हित नाही. त्यामुळे त्यांच्या मागणीवरून मनाई हुकूम दिला जाऊ शकत नाही. दुसरे असे की, हा चित्रपट अद्याप तयारही झालेला नाही. त्याआधीच त्यातील कथानक अमूक एका प्रकारचे असेल असे गृहित धरून मनाई दिली जाऊ शकत नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER