सोशल मीडिया फसवणूकीच्या जाळ्यात चित्रपट दिग्दर्शक, बिल्डरसह 176 जणांचा समावेश

मुंबई :- बनावट सोशल मीडिया (social media fraud) प्रोफाइल आणि खोटे फॉलअर्स जमवणे या रॅकेटचा सिटी क्राइम ब्रँचने पर्दाफाश केला आहे. यामध्ये चित्रपट दिग्दर्शक, बिल्डरसह 176 जणांचा समावेश आहे.

चित्रपट दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, मेक-अप् आर्टिस्ट, क्रीडा उपकरणे आणि व्यवस्थापन कंपनी आणि बिल्डर यांच्यावर आरोप आहेत की, यांनी सोशल मीडियावर फॉलोअर्स कमविण्यासाठी फसवणुकीचा मार्ग अवलंबला. यातील अनेकांना पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ही बातमी पण वाचा : ग्राहकांचे ४२७ कोटी घेऊन पळालेला बिल्डर लक्ष्मण भगतानी इंटरपोलच्या ताब्यात

गायिका भूमि त्रिवेदी (Bhoomi Trivedi) हिच्या बनावट इंस्टाग्राम प्रोफाइलची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले व सोमवारी पोलीस सचिन वझे यांच्या नेतृत्वात सेंट्रल इंटेलिजन्स युनिट (सीआययू) ने कुर्ला निवासी अभिषेक दवडे (वय 21) या फॉलोअर्सकार्ट डॉट कॉमच्या कर्मचा-याला अटक केली.

सोशल मीडिया घोटाळा काय प्रकार असतो –

या घोटाळ्यात गुन्हेगार हा आधी सोशल मीडियावर एखादे प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने खोटे अकाउंट उघडतो. त्या अकाउंटवर फॉलोअर्स कमवतो. त्यानंतर फॉलोअर्स वाढले की, त्याचा आधार घेऊन सुरुवातीला कमी किंमतीच्या कमी दर्जाच्या वस्तुंच्या जाहीराती घेतो. त्यानंतर पुढचा टप्पा हा ब्रॅंडच्या जाहीरातींकडे असतो. फॉलोअर्सच्या संख्येवरून सोशल मीडियावरून जाहीरातींच्या माध्यमातून वस्तु विक्री करतो. यामुळे जाहिरात फर्मांचे मोठे नुकसान होते. असे पोलिसांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER