आमदारकीसाठी चित्रपट महामंडळ दावणीला

Dhanaji Yamkar and Vijay Patkar criticizes Meghraj bhosale

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ (All India Marathi Film Corporation) अध्यक्ष मेघराज भोसले (Meghraj Bhosale) हे आमदार होण्यासाठी महामंडळ दुसऱ्या संघटनेला दावणीला बांधले आहेत, असा आरोप असा आरोप उपाध्यक्ष धनाजी यमकर व माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी केला आहे.

विद्यमान अध्यक्षांचा सध्या मनमानी कारभार सुरू आहे. संचालक मंडळाला ते विचारतच नाहीत. संचालकांची बैठक घेत नाहीत. करोना (Corona) संसर्गाचे कारण सांगत बैठक टाळतात, स्वत: मात्र राज्यभर फिरतात. त्याचा खर्च महामंडळाकडून घेतात. त्यांना जे वाटते, तेच ते करतात. त्यासाठी महामंडळाचा वापर करतात. महामंडळाची वाट लावली आहे, ते घटना गुंडाळून ठेऊन कारभार करत आहेत, चोरी, फसवणुकीचे अनेक पुरावे देऊनही कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. पंधरा दिवसात कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यमकर व पाटकर यांनी दिला आहे.

कलामंडळाच्या नेतृत्वाखाली चित्रपट महामंडळाने काम करणे म्हणजे हा फार मोठा विनोद आहे. चित्रपट महामंडळ ही शिखर संस्था आहे, अशा शिखर संस्थेने नोंदणी नसलेल्या मंडळाचा सदस्य म्हणून काम करणे पूर्णपणे चुकीचे आहे. भोसले आमदार होण्यास आमचा विरोध नाही, आमदारच काय त्यांनी खासदार, मंत्री व्हावे, पण त्यासाठी महामंडळाची त्यांनी वाट लाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे.

साखर चोरावर कारवाई करण्यात अध्यक्षांकडून टाळाटाळ होत असल्याचे सांगताना यमकर म्हणाले, करोनाच्या काळात सभासदांना मदत म्हणून संजय घोडावत यांनी पाचशे किलो साखर व इतर काहींनी जीवनावश्यक वस्तू दिल्या होत्या. यातील दोनशे किलो साखर रवी गावडे, शरद चव्हाण या दोन संचालकांनी चोरली, तक्रार केल्यानंतर दुसरी साखर परत आणून दिली. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली, पण अध्यक्ष कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत, असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER