
मुंबई :- शिवसेनेच्या (Shivsena) माहीम-वरळी शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पण या शिबिराची जास्तच चर्चा रंगली. याचं कारण या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन किंवा पनीर देण्यात येणार असल्याचे बॅनर परिसरात झळकले. या मुद्द्यावरून भाजपाचे (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेवर आणि सरकारवर टीका केली.
राज्यात आणि मुंबईत (Mumbai) रक्तसाठ्याचा तुटवडा आहे. या तुटवड्यासाठी ठाकरे सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदात्यांना चिकन किंवा पनीरचं आमिष दाखवलं जातंय. अशा प्रकारची नामुष्की ओढवण्यामागे सरकारचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, असे राम कदम ट्विटच्या माध्यमातून म्हणाले.
ही बातमी पण वाचा : पंढरपूरची मंदिर समिती शिवसेनेकडे; नवीन मंदिर समित्यांसाठी राजकीय हालचालींना सुरुवात
कोरोना (Corona) काळात रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्रात आणि मुंबईत रक्ताची कमतरता भासत असल्याचे अनेकदा नेतेमंडळी, मंत्री आणि अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि विविध संबंधित अधिकारी यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर शिवसेनेच्या या आगळ्यावेगळ्या रक्तदान शिबिरावर राम कदम यांनी निशाणा साधला.
मुंबई तथा महाराष्ट्र में खुन की किल्लत… सरकार की लापरवाही जिम्मेदार.. और वहीं कारण है राज नेताओ को चिकन और पनीर जैसे चीजों को लोगों को देकर ब्लड डोनेशन के लिए प्रेरित करने की नौबत आई है
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) December 9, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला