३५० कोटी पोत्यात भरून अजित पवारांच्या समोर टेकवा आणि म्हणा…

Chandrakant Patil

पुणे : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र या सेवांच्या नियंत्रणाचे आणि पुरवठ्यासंदर्भातील हक्क मर्यादित असल्याने त्या पुरवण्याची तयारी असली तरी नियमांमुळे त्या नागरिकांना पुरवता येत नसल्याचं मत भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेत आज व्यक्त केलं.

पुणे महानगरपालिकेने रेमडेसिवीर इंजेक्शन घ्यायचं ठरवलं होतं त्यासंदर्भात पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, महापालिकेला वितरकांकडून किंवा कंपन्यांकडून इंजेक्शन मिळत नाहीत. काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात झालेल्या चर्चेचा संदर्भ देत चंद्रकांत पाटलांनी, “ज्या दिवशी मी अजित पवारांबद्दल बोललो त्या दिवशी हाच मुद्दा होता. मी त्यांना म्हटलं की, ३५० कोटी पोत्यात भरून अजित पवारांच्या (Ajit Pawar) समोर टेकवा आणि म्हणा की आम्ही पैसे देण्यास तयार आहोत, तुम्ही इंजेक्शन आणि ऑक्सिजन द्या, असा प्रस्ताव ठेवण्याचं पत्रकारांना सांगितलं.

इतकंच नाही तर, राज्यात कुठेही इंजेक्शनसाठी वितरकांना पैसे अगाऊ हवे असतील तर माझ्याकडून घ्यावेत. त्यांना जिल्हा परिषदेकडून मिळाले पैसे की माझे पैसे परत करावेत, असंही पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button