तीन अनोळखी नेपाळयांविरुद्ध गुन्हा दाखल

arrested

रत्नागिरी/प्रतिनिधी : रात्रीच्या वेळी रेल्वेस्टेशनला जाण्यासाठी सांगितलेल्या भाड्यावरून रिक्षाचालकासह साक्षीदार प्रवाशाला मारहाण करणाऱ्या तीन अनोळखी संशयित नेपाळ्यांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा:- जयगड खाडीकिनारी पाण्यात बुडून खलाशाचा मृत्यू

ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास रत्नागिरी शहराच्या साळवीस्टॉप भागात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमित उदय रणसे (वय २८, रा. शांतीनगर-रसाळवाडी) हे व प्रवासी साक्षीदार रमेश खेत्री हे बसस्थानकावरून शहर रिक्षाने टीआरपी साई एजन्सी येथे जात होते. रिक्षा साळवीस्टॉप येथे आली. त्यावेळी तीन नेपाळी उभे होते. त्यांनी रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी भाडे विचारले. त्यावेळी रिक्षा चालकाने प्रत्येकी तीस रुपयांची मागणी केली.

रात्रीचे अकरा वाजल्याने दीडपट भाडे असल्याची कल्पना त्यांनी नेपाळ्यांना दिली. यावरून संशयितांनी त्यांच्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी रणसे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित तीन नेपाळ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार पाटील करत आहेत.