
धुळे : बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी भाजप नेते राजेंद्रकुमार गावित (Rajendra kumar gavit) आणि त्यांच्या पत्नी ईला गावित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज राजेंद्रकुमार गावित यांच्या नटावद आणि तळोदा येथील घरी एसीबीनं छापे टाकलेत.
राजेंद्रकुमार गावित हे माजी कक्ष अधिकारी तर त्यांच्या पत्नी या माजी पोलीस निरीक्षक आहेत. दोघांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. 42 लाखांपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एसीबीच्या तपासात नेमकं काय समोर आलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एसीबीच्या अधिकाऱ्यांनीही याबाबत माहिती देण्यास नकार दिला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला