अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयावर सीबीआयची छापेमारी

Maharashtra Today

मुंबई :- राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच देशमुख यांच्या घर, कार्यालयासह 10 ठिकाणी सीबीआयची छापेमारी (CBI Raid) करण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने (CBI) सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती.

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button