कोरोनाची नियमावली न पाळल्याने अजय देवगणच्या यूनिटवर गुन्हा दाखल

Maharashtra Today

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर बॉलिवूडला मोठा फटका बसला होता. सिनेमाचे शूटिंग लवकर सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बॉलिवूडकरांकडून केली जात होती. अखेर सरकारने ब़ॉलिवूडमधील निर्मात्यांना कोरोनाचे नियम पाळून शूटिंगची परवानगी दिली. सुरुवातीला कोरोनाचे नियम योग्यरित्या पाळले गेले पण आता कोरोनाचे नियम सेटवर पाळले जात नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कलाकार आणि निर्माता, दिग्दर्शकांना कोरोनाची लागण झाली आहे. सेटवर कोरोना नियमांचे पालन न केल्याने काही दिवसांपूर्वी मुंबईत जॉन अब्राहमच्या (John Abraham) सिनेमाचे शूटिंग बंद करण्यात आले होते तर आता अजय देवगणच्या (Ajay Devgan) ‘मे डे’ सिनेमाच्या क्रू मेंबर्सविरोधात वसई येथे कोरोना नियमांचे पालन न केल्याचा गुन्हा दाखल (Filed a case against Ajay Devgn’s unit for not following Corona’s rules)करण्यात आला आहे.

अजय देवगणने काही महिन्यांपूर्वी हैदराबाद येथे त्याच्या नव्या ‘मे डे’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. अजय देवगण या सिनेमाचा निर्माता-दिग्दर्शक असून यात अजयसोबत अमिताभ बच्चन यांचीही महत्वाची भूमिका आहे. हैदराबाद येथील शूटिंग शेड्यूल संपल्यानंतर आता वसई येथे सिनेमाचे शूटिंग सुरु करण्यात आले आहे. माणिकपुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई येथे अजय देवगणच्या या सिनेमाचे शूटिंग सुरु होते. पोलीस जेव्हा पेट्रोलिंग करीत सेटवर गेले तेव्हा एक दोन नव्हे तर १५-२० जण कोरोना नियमांची पायमल्ली करीत काम करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी मास्कही लावला नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले जात नव्हते. त्यामुळे लगेचच त्यांच्याविरोधात १८८ आणि २६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

अजय देवगणला याची माहिती मिळताच त्याने त्वरित माणिकपुर पोलिसांशी संपर्क साधला आणि यापुढे सेटवर कोरोना नियमांचे योग्यरित्या पालन केले जाईल असे आश्वासन दिले. मात्र पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा मागे घेतला की नाही त्याची माहिती तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवेपर्यंत मिळाली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button