संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा; अतुल भातखळकर यांची मागणी

Atul Bhatkhalkar - Sanjay Raut

मुंबई :- राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज रोखठोक सदरात केंद्र सरकारवर टीका केली. यासाठी, देशातील फुटरतावादी प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारे लिखाण केल्याबद्दल संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा” अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhakhalkar) यांनी केली.

ही बातमी पण वाचा : तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडले असेल…; भातखळकरांचा शिवसेनेला टोमणा

ट्विटरवर व्हीडीओ शेअर करून भातखळकर म्हणाले – संजय राऊत यांनी आज रोखठोक सदरातून अकलेचे तारे तोडले आहेत. देशामध्ये विभाजनवादी प्रवृत्ती वाढत आहेत आणि रशिया प्रमाणे राज्य फुटून निघतील. अशा स्वरूपाचे देशद्रोही वक्तव्य त्यांनी आज आपल्या लेखातून केले आहे. त्यांना एवढं देखील भान नाही, राज्य फुटली ती रशियातून नव्हे सोव्हिएत यूनियनमधून. पण, ज्या काँग्रेसने देशाची फाळणी केली. तुकडे तुकडे गँगचं समर्थन केले. त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर राऊतांना असे देशद्रोही विचारच सुचणार. माझी तर केंद्र सरकारकडे मागणी आहे, देशातील फुटरतावादी प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारे लिखाण केल्याबद्दल संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात भारतातील राज्यही रशिया सारखी फुटतील…त्यांना मला सांगावेसे वाटते की हा देश हिंदुत्वाच्या मजबूत धाग्यांनी बांधला गेला आहे, तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका, असे भातखळकर म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER